अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी, वंचित ची मागणी....
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्या ; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार निवेदन
महाराष्ट्रात जुलै महिन्यात दोन दिवसांमध्ये साधारणता १६०० मी. मी इतका पाऊस पडला असून वर्षभरात पडणाऱ्या पावसाच्या किमान ९०% पाऊस पडला आहे. वर्षभरात पुरामुळे होणारे नुसकान हे मागील एका आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहे.
त्यामुळे दरड कोसळणे, शेतजमीन खरडून जाणे, उभे पीक सुद्धा वाहून गेली असे विदारक चित्र आपल्यासमोर आहे.शेतकऱ्यांच्या शेतात
अक्षरशः नव्याने पेरणी योग्य परिस्थिती राहिलेली नाही. महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक शेतकरी विस्थापित झाले असून नुसकान झालेल्या शेतकऱ्याचें पंचेनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी यासाठी रिसोड तहसीलदार
यांना निवेदन देण्यात आले आहे.
हे निवेदन देण्यासाठी तालुका अध्यक्ष सय्यद आकील,यांच्यासह जिल्हा नेते डॉक्टर रवींद्र मोरे पाटील, गिरीधर शेजुळ, प्रदीप खंडारे, के एम तुरुक माने, संतोष शिंदे, विजय शिरसाट, यांच्यासह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
_रिसोड तालुका प्रतिनिधी / उकंडी ढेंबरे_
Comments
Post a Comment