उल्लेखनीय कामगिरी बद्द्ल राज्यमंत्री भरणे मामा यांचे हस्ते राऊत यांचा सत्कार
सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य कले म्हणून राऊत यांचा केला सत्कार.....
बहुजन परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती निमित्त शासकीय सेवेत तसेच निमशासकीय सेवेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, तसेच सहकार,सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या गुणवतांचा सन्मान सोहळा राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर शहरातील गुरूकृपा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे संपन्न झाला.यावेळी इंदापूर तालूका नाभिक समाजाचे आधारस्तंभ व पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे धडाडीचे अध्यक्ष आदरणीय श्री रमेशजी राऊत यांच्या वीस वर्षांहून अधिक काळ नाभिक समाजासाठी अविरतपणे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन, आज त्यांना राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते व आमदार श्री आमदार श्री सुनिल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास नामदार श्री भरणे मामा यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या प्रसंगी इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ,बहुजन परिषदेचे इंदापूर तालूकाध्यक्ष श्री बिभिषण लोखंडे, सचिव श्री विजय गायकवाड, कार्याध्यक्ष श्री दत्ता बाबर उपस्थित होते....
Comments
Post a Comment