इंदापुरची सुकन्या प्रियंका शहा हिने पटकावले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक
इंदापुरची सुकन्या प्रियंका संदेश शहा हिने पटकावले पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक.
इंदापूर वार्ताहर, ता. ६
इंदापूर ( जि. पुणे ) येथील कु. प्रियंका संदेश शहा हिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँडइव्हाल्यूशनचेसंचालक महेश काकडे यांच्या हस्ते कु. प्रियंका हिला सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देवूनगौरविण्यात आले.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्या -लयातून प्रियंका शहा एम.एसस्सी वनस्पती शास्त्र ही परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिला संशोधन आणि समाजकार्याची आवड आहे. जैवविविधता जतन, पर्यावरण संतुलन व संरक्षण, सेंद्रिय शेती यासंदर्भात तिनेलक्षवेधी योगदान दिले आहे.
यावेळी प्रियंका शहा म्हणाल्या, जीवसृष्टीतील पर्यावरण संतुलन हा महत्त्वपूर्ण घटक असून त्यामध्ये वनस्पती संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण यासंदर्भात संशोधन करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. माझ्या यशामध्ये माझे दिवंगतआजोबा शरद शहा व गुरुजनांचा महत्वाचावाटाआहे.
प्रियंका शहा यांना सुवर्णपदक मिळाल्याने महाविद्यालयाचा नावलौकीकउंचावलाअसल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अभय खंडागळे यांनी सांगितले. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राजेश नांगरे, डाॅ. बाजीराव शिंदे, डॉ. प्रतिमा कदम, डॉ.वर्षा श्रीराम,डॉ.हिरालाल सोनवणे, प्रा.किशोर सस्ते, प्रा. सिद्धराम मठ यांचे तिला मार्गदर्शन लाभले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा -ध्यक्ष डॉ. संदेश शहा यांची तीकन्याअसून तिने इंदापूर नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,पुणेविद्यापीठ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. संजय चाकणे, नेहरू युवा केंद्राचे माजी पुणे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment