जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या माध्यमातून बावड्यामध्ये 21लाख रुपये विविध कामांसाठी प्राप्त
   ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन
 इंदापूर प्रतिनिधी - 
  जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते बावडा येथील नागरी सुविधा अंतर्गत 21 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
  बावडा येथील ब्राह्मण बोळ  ते आतार दुकान रस्ता कॉंक्रिटीकरण चार लक्ष रुपये, एस.टी. स्टँड ते खतीब सर घर रस्ता कॉंक्रिटीकरण आठ लक्ष, पाच आंबा घोगरेवस्ती रस्ता करणे पाच लक्ष रूपये तसेच अंकिता पाटील यांच्या  जिल्हा परिषद निधीतून कैकाडी गल्ली येथे लक्ष्मी माता मंदिर सभा मंडप बांधणे चार लक्ष रुपये असे एकूण 21 लक्ष रुपयांच्या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.
  अंकिता पाटील म्हणाल्या की,'जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरी सुविधा अंतर्गत विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आज 21 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. दर्जात्मक व गुणवंतपूर्ण विकास कामे करण्याकडे प्राधान्य दिले जाईल.'
   यावेळी बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog