युवकांनी लघु चित्रपट क्षेत्रात करिअर करावे-राजवर्धन पाटील
    राजवर्धन पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते वीर मराठी प्रोडक्शनचे उदघाटन
   युवकांनी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी वीर मराठी प्रोडक्शन उद्घाटन समारंभ प्रसंगी काढले.
   समाजातील दुर्लक्षित तसेच उपेक्षित घटकावर प्रकाश टाकण्यासाठी  युवकांनी एकत्रित येऊन 'कपाळ' या वेबसिरिजच्या माध्यमातून वीर मराठी प्रोडक्शनचे कार्य सुरू केले असून आज या उद्घाटन समारंभ प्रसंगी राजवर्धन पाटील यांनी युवकांनी या क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या प्रोडक्शन साहित्यासाठी मदत करण्याचे देखील यावेळी त्यांनी जाहीर केले.
     वीर मराठी प्रोडक्शनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog