सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची मागणी
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडी रिसोड च्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावाल्या जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षीच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील सोयाबीनच्या पिकांच्या शेंगांना अंकुर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पीक विम्यासाठी कंपनीला संपर्क साधला असता कंपनीशी संपर्क होत नाही तरी तातडीने आपण सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्याचे नुसकान भरपाई ची मदत त्यांना होईल व पीक विम्याचा लाभ त्यांना मिळेल अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
त्यावेळी स्वप्निल भाऊ सरनाईक, अमोल भाऊ भुतेकर, अनिल भाऊ गरकळ, सय्यद अकील हुसेन, सुभाष बाळासाहेब खरात, तान्हाजी लिंबाजी गरकळ,किसन तुळशीराम गरकळ इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment