रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट बँक शाखा सोलापूर यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण......
सोलापूर विभाग प्रतिनिधी.... वैभव यादव.
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथे रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट बँक जिल्हा अहमदनगर शाखा सोलापूर यांच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोलापूर येथील काही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना बँकेच्या वतीने शिक्षक पुरस्कार देण्यात आले यामध्ये दहा महिला व दहा पुरुष शिक्षकांना शाल ट्रॉफी नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखेचे शाखाधिकारी अनिल सावंत साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांना भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी रेणुका धुबाम, व इसाक चिंचोली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर कोरे सर उपस्थित होते यांचा सत्कार अनिल सावंत शाखाधिकारी सोलापूर यांनी केला. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कांबळे यांनी केले, तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री प्रदीप वाघमारे यांनी केले.
Comments
Post a Comment