शौचालय नसलेल्यानी आपली नोंद तात्काळ ग्रामसेवकाकडे करा... सय्यद अकिल यांचे आव्हान
रिसोड तालुका प्रतिनिधी / उकंडी ढेंबरे
रिसोड : स्वच्छ भारत मिशन ग्राम अंतर्गत शौचालय नसलेल्या लाभार्थीयाची नावे रजिष्टर करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गांवामध्ये जनजागृती करावी अशि मांगणी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सय्यद अकिल यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीच्या वतिने पं.स.गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नविन नावे शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांची ऑनलाईन रजिष्टन सुरु होणार आहे किंवा सुरु झालेले आहे . त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून राशन कार्ड झेरॉक्स , आधार कार्ड झेरॉक्स , प्रतिज्ञापत्र हे कागदपत्र घेणे गरजेचे आहे . परंतु अनेक वेळ हि ऑनलाईन साईड सुरु होते . परंतु जनतेला याची माहिती मिळत नाही . आतापर्यंतन तिन चार वेळ साईड सुरु होवुन बंद सुध्दा झालेले आहे . परंतु जनतेपर्यंत हि माहिती गेलेले नाही . मोजक्यात आपल्या मजितल्या लोकांचे कागदपत्रे घेवुन रजिष्टर करण्यात येते . व गरजु लाभार्थी लाभा पासुन वंचीत राहतात . आता जर रजिष्टर झाले नाही तर गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळुन देता येणार नाही . त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन प्रत्येक ग्रामसेवका मार्फत रिसोड तालुक्यात प्रत्येक गांवात ग्रामसभा किंवा डंवटी मार्फत गावात जावुन प्रत्येक लाभार्थ्यांना माहिती मिळेल असे उपक्रम आपल्या यंत्रने मार्फत राबविण्यात यावे याच पध्दतीचे निवेदन आपल्याला दोन ते तिन वेळ ' देण्यात आले परंतु निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही.तरि या विषयावर गंभीरपणे लक्ष द्यावे अशि मांगणी केली आहे .निवेदनावर प्रा.ऱगनाथ धांडे,गजानन घुगे,प्रा.रवी अंभोरे,परसराम नरवाडे,आश्रूबा नवले,मोहसीन पठाण,सैय्यद रफिक अन्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment