नीरा भीमा कारखान्याच्या ट्रॅक्टर टायर गाड्यांचे पूजन
    - हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजन 
    - कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज
इंदापूर: प्रतिनिधी दि.2/9/21
         शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ट्रॅक्टर टायर गाड्यांचे (बजाट)  पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.2) करण्यात आले. नीरा भीमा कारखाना आगामी सन 2021-22 च्या  गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे.
                   कारखान्याची ऊस तोडणी व वाहतुकीची यंत्रणा गळीत हंगामासाठी सुसज्ज झालेली आहे. आगामी गळीत हंगामामध्ये कारखाना 7 लाख मे.टन ऊसाचे गाळप करणार  आहे. कारखान्याने चालू वर्षी नवीन 60 ट्रॅक्टर टायर गाड्या (बजाट) बनविण्याचा निर्णय घेतला असून, यामधील 10 बजाट गाड्या आज कारखाना कार्यस्थळावर दाखल झाल्या. चालू  होणाऱ्या हंगामासाठी कारखान्याकडे एकूण 270 ट्रॅक्टर टायर गाड्यांचे (बजाट) ऊस वाहतुकीचे करार आहेत. तसेच ट्रॅक्टर व बैलगाड्यांची यंत्रणाही सज्ज असून कारखान्यांमधील मशिनरीची दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 
           ट्रॅक्टर टायर गाड्या ( बजाट) पूजनानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याची पाहणी करून अधिकारी वर्गाला जागोजागी  सुचना दिल्या. या पूजन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, कार्यकरी संचालक डी.एन. मरकड, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
_______________________________

Comments

Popular posts from this blog