कृषीदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन......
इंदापूर प्रतिनिधी,माय मराठी न्यूज चॅनल, धनश्री गवळी.
ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यास कार्यक्रमांतर्गत सरडेवाडी येथे दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कृषीदूत श्रीकृष्ण प्रभाकर वाघमारे यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.शेती अभ्यासक्रमात ग्रामीण कृषी जागृकता, कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जातो.
यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्याला अनुसरून सरडेवाडी येथे दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील कृषिदूत श्रीकृष्ण प्रभाकर वाघमारे यांनी विविध प्रात्यक्षिके व त्यापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती नवीन आधुनिक तंत्रज्ञान, शेती उद्योग व्यवसाय, रासायनिक खतांचा वापर व इतर शेती विषयक बाबींविषयी मार्गदर्शन केले प्रा.डॉ.एस एम शिंदे, प्रा.व्हि. व्ही.माने,प्रा.डॉ. के.गुटुकडे, प्रा.कुंभार सर, प्रा.घाडगे सर आणि इतर प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले तसेच कृषि कार्यानुभव उपक्रमात प्रगतशील शेतकरी विठ्ठल कुंडलिक जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते..
Comments
Post a Comment