जोरदार पावसाने कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कळंब:-तालुक्यातील जोरदार पावसाने शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू आहे कळंब तालुक्यात देखील दमदार पाऊस झाला आहे मांजरामाय देखील दुथडी भरून वाहत असल्याने शेतकरी खुश आहे मात्र शेतातील मुगाचे पीक भुई सपाट झाले आहे त्याचबरोबर जनावरांच्या कडबा शेंद्री चे पिक देखील भुईसपाट झाले आहे .
तर कळंब तालुक्यात मात्र शेतात पाणी साचून राहिल्यामुळे सोयाबीन चे पीक पिवळे पडत चालले आहे गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे फुल गळ होऊन उत्पन्नात अगोदरच घट झालेली आहे त्यात आता अतिवृष्टीने राहिलेल्या सोयाबीन ची नुकसान होत आहे
Comments
Post a Comment