अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान....
चेतना फाउंडेशन इंदापूर यांच्यातर्फे गोविंद वृद्धाश्रम देशमुख वस्ती टेंभुर्णी येथे वृद्धाश्रमात रहिवासी असणारे सर्व वृद्ध महिला व पुरुष व बालक यांना आश्रय देणारी संस्था गोविंद वृद्धाश्रम आहे. या आश्रमाचे प्रमुख ह. भ. प. दशरथ महाराज देशमुख हे काम करत आहे. म्हणूनच त्या आश्रमासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून, चेतना फाउंडेशन यांच्याकडून अन्नदान करण्यात आले. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कोरणा च्या काळामध्ये या अन्नदानाची फार महत्वाची भूमिका ठरलेली आहे, ह-भ-प देशमुख महाराज यांनी गोविंद आश्रमा बद्दल उपस्थितांना माहिती सांगितली,यावेळी चेतना फाउंडेशन चे खजिनदार श्री माने सर व या संस्थेचा सदस्य निकिता माने यांचे ह. भ. प. देशमुख महाराज यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी चेतना फाउंडेशन चे सर्व सदस्य यांचे आभार मानले. व असेच सहकार्य आपणाकडून व आपल्या परिसरातून मिळावे अशी विनंती करण्यात आली.
Comments
Post a Comment