संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा परित्यक्ता अपंग वयोवृद्ध यांना दिले मार्गदर्शन.......
प्रतिनिधी... धनश्री गवळी इंदापूर.
खोरोची ते आज तेज पृथ्वी ग्रुप चे मार्गदर्शक नानासाहेब खरात, यांच्या अध्यक्षतेखाली,सागर मिसाळ यांच्या उपस्थितीत संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अपंग विधवा परित्यक्ता वयोवृद्ध यांना संजय गांधी निराधार योजनेचे फायदे व माहिती सांगून यासंदर्भात अर्ज कशा पद्धतीने भरले पाहिजेत याची माहिती तसेच खोरोची परिसरातील महिलांना लघु व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात आले यासाठी बचत गटातून कर्ज पुरवठा केला जातो याची माहिती देण्यात आली मिसाळ यांनी आपल्या भाषणामध्ये असे सांगितले की या गावातील सर्व वडीलधारी मंडळी बंधू-भगिनी हे सर्व माझे परिवारातील आहेत यांना कसलीही अडचण आली तर तेज पृथ्वी ग्रुपच्या त्यांना आवाज द्या आम्ही कोणतेही राजकारण न करता शक्य तेवढी मदत करु या ग्रुपच्या माध्यमातून आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी रेहना ताई मुलानी युवा नेते संपत भाऊ सरक, उमेश चव्हाण, अशोक घोडके, तेज पृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे , कार्याध्यक्ष तानाजी हे गडकर, पोलीस पाटील भीमराव पाटील , तसेच,कैलास देवकर, आबा साठे ,जौजाळ मॅडम, उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार साठे यांनी केले तर, आभार प्रदर्शन तेज पृथ्वी ग्रुपच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्षा, अर्चनाताई गोरड यांनी केले.
Comments
Post a Comment