नीरा भीमा कारखान्यावरती श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात
इंदापूर:प्रतिनिधी दि.10/9/21
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात शुक्रवारी (दि.10) करण्यात आली.
कारखान्याच्या कार्यस्थळावर माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या कल्पनेतून श्रीगणेशाचे सुंदर असे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रसंगी विधिवत पूजा संचालक दत्तात्रय शिर्के यांच्या हस्ते तर आरती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्री गणेशाने जनतेची कोरोनाच्या संकटातून सुखरूप सुटका करावी, असे साकडे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी घातले. यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, दादासो घोगरे, चंद्रकांत भोसले, माणिकराव खाडे, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
_______________________________
Comments
Post a Comment