विकास कामा करिता राष्ट्रवादी पार्टीमध्ये केला प्रवेश
प्रतिनिधी धनश्री गवळी इंदापूर.
अवसरी ग्रुप ग्रामपंचायत चे उपसरपंच सोमनाथ जगताप यांनी आपल्या अवसरी बेडसिंगे गावाचा विकास करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गावातील विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही असे उपसरपंच सोमनाथ जगताप यांनी सांगितले. नामदार भरणे मामा यांच्याकडून उपसरपंच सोमनाथ जगताप यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रवेश कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे उपाध्यक्ष श्री प्रशांत पांडुरंग कवितके उपस्थित होते. तसेच यावेळी राहुल मरळे, रवींद्र काटे, बाळू कुलकर्णी, सुचित शिंदे, बाबा झगडे, इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment