बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी उत्कर्ष डुरे यांची निवड
बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी उत्कर्ष डुरे यांची निवड
वैराग दि (प्रतिनिधी) बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका सरचिटणीस पदी येथील उत्कर्ष डुरे यांची नुकतीच निवड करण्यात आली .
सामान्य युवकांच्या विकासासाठी भरीव कार्य करून पक्ष बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुका सरचिटणीस पदी वैरागचे उत्कर्ष आनंदकुमार डुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बार्शी तालुका अध्यक्ष अमर बाबासाहेब पाटील यांनी दिले आहे .
बार्शी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली . या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवक प्रदेश सरचिटणीस अरुण आसबे,निरंजन भुमकर,गणेश पाटील,सावळे सर, आदी उपस्थित होते, या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन प्रशांत भालशंकर यांनी केले . निवडीबद्दल उत्कर्ष डुरे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .
Comments
Post a Comment