रो ट्रॅक्ट क्लब ने राबवल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा....

प्रतिनिधी सोलापूर
वैभव यादव. 
    ‌ आज सोलापूर येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर नेहरू युवा केंद्र व रो ट्रॅक्ट क्लब संगमेश्वर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सोलापूर येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जवळ जवळ वीस ते पंचवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता.स्पर्धा जिल्हास्तरीय असल्यामुळे या स्पर्धेचे क्रमांक लवकरच सांगण्यात येणार आहेत असे स्पर्धेचे संयोजक यांनी सांगितले आहे. या स्पर्धेसाठी परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी यादेखील उपस्थित झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रो ट्रॅक्ट क्लब सोलापूर नॉर्थ चे विजय देगावकर तसेच रोट्रॅक्ट क्लब सोलापुर नॉर्थ चे तात्काळ माजी अध्यक्षा पुनम मॅडम व सेक्रेटरी अर्जुन असटके सर तसेच रो ट्रॅक क्लबचे संगमेश्वर कॉलेजचे सर्व बी.डी.ओ. मेंबर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog