साठे पुतळा प्रकरणात मातंग समाजावर लाटीचार्ज करणाऱ्या डी.वाय.एस.पी चे निलंबन करा : बालाजी गायकवाड
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब:-मौजे गउळ ता कंधार जिल्हा नांदेड येथील साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जिथे आहे तिथेच बसवा तसेच पुतळ्याची अवहेलना करून तेथील मातंग समाजावर लाठीचार्ज करणाऱ्या डी वाय एस पी चे तात्काळ निलंबन करा तसेच गावातील जातीवादी गावगुंडावर कायदेशिर कार्यवाही करा आदी मागण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयावर व पोलीस स्टेशन कळंब समोर निदर्शने करुन मा.मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले यावेळी लहुजी शक्ती सेनचे ऊस्मानाबाद जिल्हा कोरकमेटी जिल्हा अध्यक्ष बालाजी गायकवाड,कोअर कमिटी कळंब तालुका अध्यक्ष धनंजय मोरे,कळंब तालुका संघटक विठ्ठल ताटे,यूवक तालूका उपाध्यक्ष आशिष शिंदे,कृष्णा मोरे, श्रेयस मोरे ,अनिल शिरसाट, राहुल रोकडे,अजय चव्हाण, शिवाजी कसबे,भरत शिरसाट, सुरज रोकडे,लखन शिंदे, अभिषेक चव्हाण,अशोक शिरसाट,सागर शिरसाठ,शुभम कुचेकर, परमेश्वर शिंदे,अक्षय शिंदे, सनी मोरे,किरण गायकवाड,विशाल कांबळे  संदीप गायकवाड ,आदित्य गायकवाड, अविनाश गायकवाड ,अजय कांबळे,साईनाथ चव्हाण ,अजय रोकडे,ईत्यादी समाज बांधव ऊपस्थित होते

Comments

Popular posts from this blog