बावडा येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन
इंदापूर: प्रतिनिधी दि.7/9/21
बावडा येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 320 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे सदस्य प्रदीपमामा जगदाळे, नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील आदी मान्यवरांचे हस्ते मंगळवारी (दि.7) करण्यात आले. यावेळी राजवर्धन पाटील यांच्या हस्ते रोहित राजेंद्र चव्हाण याचा जय मल्हार क्रांती संघटनेचे इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. या जयंती कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार मित्र मंडळ बावडा व समस्त रामोशी समाज बांधवानी केले.
__________________________
Comments
Post a Comment