राजवर्धन पाटील यांच्या हस्ते ५० टक्के सवलतीमध्ये पिठाच्या गिरणीचे वाटप
इंदापूर प्रतिनिधी
हर्षवर्धन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या बेलवाडी येथे निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते राजवर्धन दादा पाटील यांच्या हस्ते महावितरण वीज बिल भरणा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडी परिसरातील महिलांना पिठाच्या चिक्कीचे अल्पदरात वाटप करण्यात आले.
बेलवाडी येथील संस्थेने तसेच शरद जामदार आणि सहकाऱ्यांनी घेतलेला उपक्रम स्तुत्य आणि लोकउपयोगी असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजवर्धन पाटील यांनी दिली.
बेलवाडी गावामध्ये प्रथमच वीज बिल भरणा केंद्र सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
महावितरनचे शाखा अभियंता यादव साहेब व संस्थेचे संस्थापक सर्जेराव काळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षवर्धन पतसंस्थेचे चेअरमन व इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शरद जामदार यांनी केले.सर्वसामान्य व्यक्ती विकासाला महत्व देऊन हर्षवर्धन पाटील यांनी कार्य केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सवलतीमध्ये पिठाच्या गिरणी नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती शरद जामदार यांनी दिली.
यावेळी वालचंदनगर उपविभागाचे विकास पवार, विठ्ठलराव जाचक ,शहाजी शिंदे, जाधव गुरुजी ,शशिकांत जामदार, अशोक काळे ,सोमनाथ काळे, प्रताप पवार, संजय पवार ,उद्धव जाधव, सुधीर पवार ,अक्षय मचाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगदीश शिर्के यांनी केले.कार्यक्रमाचे आभार ज्योतिराम जामदार यांनी मानले.
सागर शिर्के, वैभव शिंदे, शुभम सोनटक्के यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
Comments
Post a Comment