मानाचा गणपती ची प्रतिष्ठापना.....
प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी..
इंदापूर येथील मानाचा दुसरा गणपती श्री नरसिंह प्रासादिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या कासारपट्टा नामदेव मंदिरातील श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा संध्याकाळी सात वाजता करण्यात आली.मंडळाचे कार्यकर्ते श्री.गौरव कळसकर व सौ. साक्षी कळसकर या दांपत्याच्या हस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा पूजा व आरती करण्यात आली. श्री दिपक काका बडवे यांनी सालाबाद प्रमाणे पूजापाठ व मंत्रोपचार केले.या वेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्रींची प्रतिष्ठापणा करण्यात आली.मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री भरत देशमाने यांनी सांगितले की या वर्षीही कोणताही मोठा खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपत मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार व मार्गदर्शक ॲड श्री धनंजय विंचु, रोटरी क्लब इंदापूरचे अध्यक्ष व मंडळाचे माजी अध्यक्ष श्री उदयशेठ शहा यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांनी एकदम साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले असून इतर अनावश्यक खर्चाला टाळून व ऑक्सिजनचे महत्त्व ओळखून येत्या दोन चार दिवसांमध्ये वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्य करण्याचे ठरविले असून आहे जेणे करून त्याचा समाजाला उपयोग आणि मदत होईल.मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर व इतर समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असत परंतु या कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे इतरांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे म्हणून यंदाचा गणेशोत्सव सध्या पद्धतीने करण्याचा कार्यकर्त्यांनी ठरविले आहे.परिसरातील नागरिक बंधु भगिनींना ही शासनाच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment