धर्मवीर संभाजीराजे सहकारी पतसंस्थेवर बिनविरोध निवड......
इंदापूर प्रतिनिधी..... धनश्री गवळी.
     धर्मवीर संभाजीराजे सहकारी पतसंस्था इंदापूर या पतसंस्थेने नाभिक समाजातील एका होतकरू तरुण श्री बापूराव भगवान दळवी यांची धर्मवीर संभाजीराजे सहकारी पत संस्था इंदापूर या पतसंस्थेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड केली आहे. या निवडीमुळे नाभिक समाजा मधील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या निवडीनंतर दळवी यांनी असे सांगितले कि मी तन-मन-धनाने अतिशय प्रामाणिकपणे या संस्थेशी एकनिष्ठ राहून काम करेन. या वेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती आशालता संदिपान भोसले तसेच व्हाईस चेअरमन श्री सुहास भानुदास पवार यांच्या हस्ते हार नारळ शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी संचालक श्री शरद सोपान गलांडे, श्री आनिल भीमराव भोसले, श्री सुनील जनार्दन पवार, श्री किशोर अभिमान साखरे, श्री गेनदेव बाबुराव सांगळे, सचिव श्री अंकुश सुखदेव गलांडे, मोहन पांडुरंग कळसाईत, तसेच पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog