महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे- हर्षवर्धन पाटील
इंदापूर:प्रतिनिधी दि.10/9/21
          सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये महिलांचे आरोग्याकडे जास्त दुर्लक्ष होताना दिसत आहे. योग्य वेळी उपचार केल्यास आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे महिलांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.10) केले.
      शहाजीनगर येथे शहाजीराव पाटील शॉपीग सेंटर येथे शिव क्लिनिकचे उद्घाटन हर्षवर्धन  पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक 
डॉ.मयुरी योगेश बनकर-भोंग यांनी केले. तर मान्यवरांचे स्वागत योगेश भोंग, राजाराम भोंग व भोंग कुटुंबियांनी केले.
                नीरा भीमा कारखान्यामुळेच या परिसराचा विकास झाला आहे, याचा मनोमन आनंद होत आहे. त्यामुळे शहाजीनगर परिसरात नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. वरकुटे खुर्दच्या शेतकरी कुटुंबातील डॉक्टर सून क्लिनिक सुरु करीत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
      यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, दादासो घोगरे, चंद्रकांत भोसले,  कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, माणिकराव खाडे, संतोष जगताप, एच. के.चव्हाण, मुख्तार मुलाणी, बबलू पठाण, विजयसिंह कानगुडे, गणेश अनपट, सुनील पवळ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार नितीन भोसले यांनी मानले. या कार्यक्रमानंतर शहाजीराव पाटील शॉपिंग सेंटरच्या गाळेधारकांच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून सत्कार करण्यात आला.
_____________________________

Comments

Popular posts from this blog