अवसरी येथे covid-19 लसीकरणास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.....
इंदापूर प्रतिनिधी... धनश्री गवळी इंदापूर..
   covid-19 लस घेण्यासाठी अवसरी मध्ये आज गावातील महिला व पुरुष तसेच तरुण वर्ग यांच्यामध्ये उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला, गेल्या काही दिवसापासून या गावांमध्ये माननीय सरपंच श्री संदेश शिंदे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकिता ताई पाटील यांची प्रेरणा घेऊन व यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी गावातील अठरा वर्षाच्या पुढील प्रत्येक व्यक्तीस covid-19 ची लस ही मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला व तो प्रयत्न आज जवळ जवळ 60 टक्के पूर्ण झाला आहे उर्वरित सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे व संपूर्ण गाव हे कोरोणा मुक्त तसेच 100%लसीकरण घेतलेले गाव म्हणून या गावाची ओळख होईल असे त्यांनी पत्रकारांना यावेळी सांगितले.आजअवसरी गावामधील श्रीहनुमान विद्यालय येथे  240 स्त्री-पुरुष लाभार्थी यांना कोविड लसीकरण करण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत लसीकरण मोहीम सुरू होती या लसीकरणासाठी अवसरी बेड सिंगे येथून लोक उपस्थित राहिले होते. उर्वरित बेड शिंगे ,अवसरी, येथील अठरा वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना लवकरच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. आज या लसीकरणा दिवशी भाजप चे युवा नेतृत्व नेते  श्री राजवर्धन पाटील यांनी लसीकरण केंद्रास भेट दिली.

यावेळी आरोग्य विभाग सुरवड येथील डॉक्टर बापूराव चोरमले, आरोग्य सेविका कल्पना बुधावले, तसेच अर्चना माने, रूपाली पांढरे, सुलोचना बनसोडे, सीमा तीकोटे, संगीता फलफले, गणेश तिकोटे, आकाश शिंदे, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते तसेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  अवसरी ग्रामपंचायतचे उपसरपंच सोमनाथ जगताप, सदस्या ,, नंदा  झगडे, संगीता शिंदे, चंद्रकांत कवितके, समाधान मोरे, पांडुरंग कांबळे, ग्रामसेविका रूपाली व्यवहारे, रवी काटे तसेच  अजित साळुंके ,नितीन कांबळे, तसेच  सरपंच मित्र परिवार ,ग्रामस्थ मोठ्या  संख्येने शांततेत उपस्थित होते.  

Comments

Popular posts from this blog