वीज कोसळून नुकसान झालेल्या निमगाव केतकी येथील घराची हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी
 इंदापूर प्रतिनिधी-
   निमगाव केतकी येथील शेतकरी बबनराव पाटील यांच्या घरावरीत 1 ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठा आवाज होऊन वीज कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले होते आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथील पाटील यांच्या घराची पाहणी करून त्यांना दिलासा दिला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विजेमुळे घराच्या स्लॅपचा काही भाग फुटून खाली आल्याने घराचे मोठे नुकसान झाले. 
  घरावर वीज कोसळल्याने बबनराव पाटील कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घराची पाहणी करून पाटील कुटुंबीयांना दिलासा दिला आहे.
   यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव आणि पाटील कुटुंबीय उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog