राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मोफत लसीकरण...
प्रतिनिधी.वैभव यादव सोलापूर.
आज सोलापूर येथे भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्फत लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती याचे औचित्य साधून, थोर पुरुषांच्या प्रथमेश हार घालून सदर कार्यक्रमास सुरुवात झाली. सोलापूर येथे अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड सोशल सायन्स यांच्या वतीने मोफत कोरोना लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाच्या वेळेस जवळ जवळ 65 लोकांना लसीकरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी एम बी विभाग प्रमुख प्रोफेसर प्रीतम कोठारी, एमबीए विभाग प्रमुख डॉक्टर अकबर नदाफ सर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रोफेसर सूर्यवंशी सर, प्राध्यापक राहुल मांजरे सर, एम एस डब्ल्यू प्रभारी संचालिका डॉक्टर जयश्री मेहता, प्राध्यापिका रोहिणी पावड शेट्टी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी एम बी ए प्रतिनिधी देवराज, खजिनदार बीबीए प्रतिनिधी परवेज, बी सी प्रतिनिधी अपूर्वा, एम सी ए प्रतिनिधी सागर, तसेच एन एन एस एस मधील सर्व स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते...
Comments
Post a Comment