एकच निर्धार कोरोना  हद्दपार राष्ट्रवादीने केला निर्धार,.....
प्रतिनिधी... धनश्री गवळी इंदापूर.
  इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नगरसेवकांनी इंदापूर शहरातील आपल्या स्वतःच्या वार्ड मध्ये कोविड लसीकरण करण्यासाठी त्यांनी जनजागृती मोहीम सुरु करुन नागरिकांना कोरोणा कोवि शील्ड लसीकरणासाठी जागृत करून त्यांना लस सावता माळी मंदिर, सरस्वती नगर, इंदापूर येथे उपलब्ध करून देण्यात आली. कोरणा ची तिसरी लाट थांबविण्याकरिता योग्य खबरदारी म्हणून आपल्या वॉर्डातील नागरिकांना लस देण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये अठरा वर्षा पुढील सर्व स्त्री-पुरुष यांना या लसीचा फायदा होणार आहे असे इंदापूर नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते, पोपट शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक श्री रमेश शिंदे  यांनी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वच्छता व सोशल डिस्टंसिंग याचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमासाठी इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेवक स्वप्निल नाना राऊत, माजी नगरसेवक राजेश शिंदे, तसेच इतर सावता माळी दहीहंडी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog