माझ्या शाळेने केलेल्या सत्काराने मी खरच भारावून गेलो.....
नूतन संचालक, शांतीलाल शिंदे पाटील.
प्रतिनिधी.धनश्री गवळी इंदापूर.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालक पदी बिनविरोध निवडून आलेले अवसरी चे श्री शांतीलाल दत्तात्रय शिंदे पाटील यांचा सत्कार आज श्री, हनुमान विद्यालय अवसरी मध्ये करण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच आप्पासाहेब जगदाळे व पद्मजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. सत्कार प्रसंगी नुतन संचालक यांनी असे सांगितले की मी शेतकऱ्याचे हित व त्यांचे आर्थिक फायदा कसा होईल याकडे लक्ष देणार आहे. यावेळी त्यांनी माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब , आप्पासाहेब जगदाळे, पद्मजा भोसले यांचे आभार मानले . तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक श्री घळके सर यांनी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री राऊत सर यांनी केले.
Comments
Post a Comment