मुंबई म्हाडाकडून प्रधानमंत्री आवास योजनेची केंद्राची हिशेची रक्कम प्राप्त नसल्याची माहिती अधिकारात उघड...
देवणी तालुका प्रतिनिधी दिनांक.01.10.2021.
माहितीच्या अधिकारात श्री पांडुरंग कदम देवनी जिल्हा लातूर यांनी पीएम घरकुल देवनी शहरातील मंजूर 575 लाभार्थीचे केंद्र शासनाच्या हिसाचे प्रत्येकी लाभार्थीं दीड लाख अनुदान मागील तीन वर्षापासून मिळत. नसल्याबाबत विचारणा केली असता गृहनिर्माण विभाग मुंबई उपअभियंता किशोर साळवी यांनी. आज तागायत केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याचे लेखी पत्र क्रमांक.293/21. दिनांक.30.09.2021. रोजी आरटीआय मागणी अर्जाला उत्तर कदम यांना देण्यात आले.
थोडक्यात असे की महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण सुकानु अभिकरण व अभियान संचनालयकडून शासन निर्णय.09.12.2015. नुसार राज्यात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. देवणी शहरात मार्च 2018 मध्ये पीएम घरकुल मंजूर लाभार्थी 575 असून. प्रत्येकी लाभार्थी अनुदान अडीच लाख रुपये आहे. त्यापैकी राज्य शासनाचा हिस्सा.1.00. रुपये व केंद्राचा हिस्सा.1.50. रुपये असून राज्य शासनाचे चे रक्कम लाभार्थ्यास प्राप्त झाली असून केंद्र शासनाची रक्कम मागील तीन वर्षापासून प्राप्त झालेली नाही. एक गंभीर बाब आहे. देवणी नगरपंचायत भाजपा. शासन स्थानिक आमदार भाजपा. लोकसभा खासदार भाजपा. आणि केंद्र शासन भाजपा शासन कार्यरत असून अनुदान देण्यापासून रोकले कोण ? असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडलेला आहे. अडीच लाखाची तरतूद नसताना पीएम आवास आवास योजना मंजूर कसे केले ?. तरतूद आहे रक्कम का दिली जात नाही! गलिच्छ राजकारणामुळे घरकुल लाभार्थ्याचे संसार उघड्यावर असून घराचे स्वप्न भंगले असून अनुदान रखडल्यामुळे अपूर्ण बांधकाम. झालेले आहे. भाजपा आमदार खासदार यांनी याकडे गांभीर्याने विचार करून घरकुल अनुदान मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे अभिप्रेत आहे . अन्यथा येणाऱ्या दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रातील जनता हिशोब चुकता करेल. हे निश्चित!
Comments
Post a Comment