लोणी देवकर येथे हर्षवर्धन पाटील यांनी अल्पोपहार घेत साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
इंदापूर प्रतिनिधी-
  राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज लोणी देवकर येथील बाबर बंधू यांच्या त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटर येथे गावातील जेष्ठ नागरिक व सहकाऱ्यांसमवेत त्रिमूर्ती स्नॅक्स सेंटरचा प्रसिद्ध शेव चिवडा व कांदा भजी यांचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. सकाळच्या मनमुराद आशा गप्पांच्या मैफिलीत उत्साही वातावरणात ज्येष्ठ नागरिक आनंदाने सहभागी झालेले दिसले.
   हर्षवर्धन पाटील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नेहमी त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत असतात. तसेच नागरिकांमध्ये चहाच्या निमित्ताने किंवा इतर कारणाने त्यांच्याशी गप्पांच्या मैफलीत सहभागी होत असतात. आज लोणी देवकर येथे बाबर बंधू यांच्या त्रिमूर्ती स्नॅक सेंटर येथील प्रसिद्ध शेवचिवडा व कांदा भजी याचा त्यांनी आस्वाद घेतला आणि उपस्थित नागरिकांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच्या कृतीचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog