तुळजाभवानी देवीचे हर्षवर्धन पाटील यांनी घेतले सहकुटुंब दर्शन
इंदापूर प्रतिनिधी-
राज्यातील सर्वच मंदिरे घटस्थापनेच्या दिवशी सुरू झाले असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे मंदिरही सुरू झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन राज्यातील कोरोनाचे संकट दूर करण्याची प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
यावर्षी शारदीय नवरात्री उत्सव गुरुवार दि.7 आक्टोबर पासून सुरू होत आहे. सर्वत्र हा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील, मुलगा नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment