हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वनक्षेत्रपाल पदावर निवड झालेले प्रमोद कांबळे यांचा सत्कार
इंदापूर प्रतिनिधी-
प्रमोद शिवाजी कांबळे यांची वनक्षेत्रपाल पदावर निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महात्मा फुले विद्यालय बिजवडीचे माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांचे प्रमोद कांबळे चिरंजीव असून ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाले असून त्यांची वनक्षेत्रपालपदी निवड झाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की तालुक्यासाठी ही बाब आनंदायी आहे. स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होणाऱ्या युवकांना प्रेरित होऊन विद्यार्थी अधिक जोमाने आपले प्रयत्न करून या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतील.'
प्रशालेचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच प्रमोद कांबळे यांचे आई वडील यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment