वैरागच्या सामाजिक कार्यकर्त्याचे मुख्यमंत्री महोदयांना पत्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या..😢
माननीय मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र राज्य मुंबई
यांना
सविनय सादर
कारणे विनंती पत्र लिहितो की बार्शी तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून अतिवृष्टी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांचा आलेला घास पूर्णपणे वाया गेला आहे माझी साहेब आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत आपल्या सरकारकडून मिळावी व शेतकरी आत्महत्या उपसून वाचवावा कुठलेही पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना केल्याशिवाय शेतकरी उबदार री येणार नाही म्हणून आपण ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्या विम्याची रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा करावी व बळीराजाला या अस्मानी संकटापासून वाचवावे माननीय मुख्यमंत्री साहेब आपण गेल्या दोन-तीन वर्षापासून अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहात परंतु निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे त्याकरिता आपण स्वतः आपले प्रतिनिधी किंवा आपण स्वतः घेऊन बार्शी तालुक्याची परिस्थिती पहावी व सरसकट सर्व शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत त्वरित मिळावी ही आमच्या तालुक्याच्या वतीने मी आपणास नम्र विनंती करीत आहे साहेब आपण ठरवल्यास हे काम लवकरात लवकर पार पडेल अशी आम्हाला पूर्णपणे आपली खात्री वाटते तरी कृपया साहेब आम्हा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी जाहीर करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची रक्कम आम्हाला ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर ती द्यावी त्याशिवाय शेतकरी त्याच्यातून बाहेर पडणार नाही गुरेढोरे घरे पडले आहेत शेतकऱ्यांची अतिशय भयानक परिस्थिती या गुलाबी वादळाने तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहे सर्व मध्यम प्रकल्प मोठे प्रकल्प नद्या-नाल्यांना भरून वाहत आहेत त्यामुळे लोकांना रानात जाऊन पंचनामा करायला सुद्धा कमी चान्स आहे तरी साहेब मी आपणास पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला त्वरित मदत मिळावी हे नम्र विनंती कळावे
आपलाच.
सुनील अप्पा पवार
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैराग विभाग
Comments
Post a Comment