कोरोना लसीकरण मोहीम केंद्र सरकारचा कार्यक्रम - शकील सय्यद
- राष्ट्रवादीकडून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न
- राष्ट्रवादीकडून शासकीय नियमांचा भंग
- इंदापूर नगरपालिकेची यंत्रणा सक्षम
इंदापूर: प्रतिनिधी दि. 9/10/21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा कोरोना लसीकरण मोहीम हा नागरिकांसाठीचा देशव्यापी महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. इंदापूर शहरात लसीकरण मोहीम जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शासकीय नियमांचा भंग केला आहे. लशीकरण हा शासनाचा कार्यक्रम असताना चक्क राष्ट्रवादीकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे. शासनाची कोरोना लसीकरण मोहीम ही एखाद्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली राबविता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या लसीकरण मोहिमे संदर्भात शासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी इंदापूर शहर भाजपचे अध्यक्ष शकील सय्यद यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, भाजप प्रदेशाध्यक्ष, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांना निवेदने पाठविली आहेत.
शासनाच्या वतीने कोरोना लसीकरणाची मोहीमे बाबत नियम स्पष्ट आहेत. एखाद्या पक्षाच्या वतीने शासनाची लसीकरण मोहीम राबवता येतच नाही, त्यामुळे इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो व पक्षाचे चिन्ह टाकून जाहीर केलेल्या लसीकरण मोहिमे संदर्भात शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षीय पातळीवरील लसीकरण मोहिमेला उपजिल्हा रुग्णालयातून लशीचा पुरवठा केला जात आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास शेळके यांचेवरही शासनाने कडक कारवाई करावी. इंदापूर शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहिम राबविण्यात यावी. लसीकरण मोहिमेसाठी इंदापूर नगरपालिका सहकार्य करेल, असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती शकील सय्यद यांनी दिली.
या निवेदनावर उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष पांडुरंगतात्या शिंदे, नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक गोरख शिंदे, सुनील अरगडे, जावेद शेख, अभिजित अवघडे, आबासाहेब थोरात, सागर अरगडे, संदीप चव्हाण, अस्लम शेख, अक्षय राऊत, विकी खुडे ,अशोक व्यवहारे आदींच्या साह्य आहेत. सदरचे निवेदन इंदापूर तहशिलदार यांना शुक्रवारी भेटून देण्यात आले.
_____________________________
Comments
Post a Comment