हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वसंत फलफले यांचा सत्कार
इंदापूर प्रतीनीधी-
इंदापूर तालुका शिक्षक सह.पतसंस्थेच्या चेअरमनपदी वसंत फलफले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी पतसंस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची पतसंस्थेचे काम आदर्शवत असून जिल्ह्यातील पगारदार विभागातील अग्रगण्य पतसंस्था आहे. सर्व संचालक मंडळाने उत्कृष्ट कारभार करून पतसंस्थेचा नवलौकीक वाढवावा.
यावेळी शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन सुनिल वाघ , हरिश काळेल , विलास शिंदे , सुनिल शिंदे , सुनिल कोकाटे , लतिफ तांबोळी , अमोल बोराटे , भारत गायकवाड , दिपक वाघ , जुनी पेन्शन तालुका अध्यक्ष संतोष हेगडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment