आपल्या कार्याने इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे- हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पशुधन विकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यामधील कु.डॉ. श्रद्धा रामदास रणनवरे, डॉ. सचिन ज्ञानदेव काकडे, बावडा येथील डॉ.अनिल सुरेश शिंदे व पिटकेश्वर गावाचे डॉ. उमेश व्हरकुटे यांचा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याने स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले असून त्यांनी आपल्या कार्याने इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे. त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.'
Comments
Post a Comment