दक्ष पोलिसांचे गुन्हेगारावर लक्ष....
इंदापूर प्रतिनिधी... धनश्री गवळी.
इंदापूर पोलिसांकडून 500 पोती गहू व एक 10 चाकी ट्रक जप्त.

आज रोजी इंदापूर पोलीस ठाणे अंतर्गत सरडेवाडी टोल नाक्या जवळ सोलापुर पुणे रोडच्या जवळ सर्व्हिस रोडवर पुण्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 13 AX 4709 या गाडीची दोन पंचांसमक्ष तपासणी केली असता सदर ट्रकच्या चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याच्या ताब्यातील ट्रक मधील मालाची तपासणी करता त्यामध्ये एकूण (500)पाचशे गव्हाची पोती मिळून आले त्याबाबत चालकाकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.  सदरचा गहू कोणत्यातरी शासकीय गोडाऊन मधून चोरून अवैधरित्या जीवनावश्यक वस्तू चा साठा करून काळया बाजारामध्ये सदरचा गहू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सविस्तर पंचनामा करून सदरचा दहा चाकी ट्रक त्यामधील पाचशे पोती गहू म्हणजेच एकूण 25 टन असा एकूण पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलेला असून यातील ट्रक चालका विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3, 7 तसेच भारतीय दंड संहिता अधिनियम कलम 379, 420 अन्वये गुन्हा दाखल केला.

Comments

Popular posts from this blog