पतंजली योग समितीने केला वाढदिवस साजरा....
इंदापूर प्रतिनिधी... धनश्री गवळी
आज इंदापूर येथे पतंजली योग समिती च्या वतीने महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक कृती समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री विलास गाढवे सर यांचा वाढदिवस पतंजली योग समितीचे अध्यक्ष अनपट सर यांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांना आयुर्वेदिक रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आयुर्वेदाचे महत्त्व सांगून रोपांचे संवर्धन करून आपण प्रत्येकाने स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य उत्तम ठेवून समाजासाठी आपण मार्गदर्शक ठरावे व इतरांना योगाचे महत्व सांगावे असे त्यांनी सांगितले. हसल्याने आरोग्य उत्तम राहते याचा एक उत्तम नमुना या ठिकाणीच सादर झाला व सर्व जण मोठमोठ्याने हसू लागले. यावेळी कर्मयोगी सहकारी कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे पाटील, इंदापूर तालुका माध्यमिक सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन श्री नानासाहेब घळके सर, संचालक संजय झगडे सर, इंदापूर तालुका शिक्षण क्रीडा विभाग प्रमुख झोळ सर, कुदळे सर, सोनमाळी सर, लोकरे सर, गवळी सर, दडस सर, गिरडे सर ,चव्हाण सर, घाडगे सर,परबत सर, फासे रावसाहेब, माने रावसाहेब, सावंत रावसाहेब, एस बी टेलर इंदापूर,निंबोळे ताई, अर्चना शेवाळे, इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment