चंद्रनील सोशल फाउंडेशन गौरी गणपती बक्षीस वितरण
प्रतिनिधी वैभव यादव
चंद्रनील सोशल फाउंडेशन आणि मित्र परिवार आयोजित गौरी गणपती आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न!!!
चंद्रनील सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सी.ए.सुशील बंदपट्टे आणि चंद्रनीलचे सदस्य* यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या गौरी गणपती २०२१ स्पर्धेच्या विजेत्याचे काल बक्षीस वितरण *वडार समाज आय्या गणपती ट्रस्ट अध्यक्ष श्री राजा भाऊ कलकेरी आणि वडार समाज पंच कमेटीचे श्री सदाशिव मुद्दे* यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
शहर उत्तर साठी आयोजित या स्पर्धेची घोषणा करण्यात आल्यानंतर विविध भागातून तब्बल २५० ते २७५ व्हिडियो या स्पर्धेसाठी आले होते त्यातील काही निवडक आणि विशेष अश्या सजावटीचे पाहणी चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या टीम ने प्रत्यक्ष भेट देऊन केल्या होत्या स्पर्धेसाठी प्रतिसाद आणि त्यातून बक्षीस जाहीर करताना चंद्रनील टीमच्या अडचणी वाढल्या होत्या त्यावेळी सदर कोरोना परिस्तिथी,आर्थिक परिस्तिथी, उपलब्ध साहित्यातून उत्कुष्ट संकल्पनेला प्राधान्य देत शेळगी येथील सौ कारले यांना प्रथम बक्षीस- फ्रीज जाहीर करण्यात आले
त्याच धर्तीवर साक्षी पवार यांना दुसरे बक्षीस – टी.व्ही. जाहीर करण्यात आले रा. बुधवार पेठ सोलापूर
तिसऱ्या बक्षीससाठी खुप चुरस असताना खालील स्पर्धेकानी तिसरे बक्षीस-मिक्सर पटकाविले-
सौ शांताबाई रविंद्र भांडेकर,शुभम गुळसकर, सौ.केकडे ,उमाकांत फुगारे ,सौ वैभवी जगदाळे, सौ. सुवर्णा शिंदे,श्री नारायण बनकर
सदर कार्यक्रमाची प्रस्थावना चंद्रनील सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष *सी.ए.सुशील बंद्पट्टे* यांनी केली व कार्यक्रमास मा.श्री.दीपक जाधव ,मा.श्री.गोपाळ पाथरूट, मा.श्री.पुनाजी भांडेकर मा.श्री.सुशील कंदलगावकर मा.श्री नंदकिशोर भांडेकर
मा.श्री विकास विटकर मा.श्री जयवंत यमपुरे मा.श्री बालाजी यमपुरे मा.श्री विनायक अलकुंटे व चंद्रनीलचे सदस्य व आधी मान्यवर उपस्थीत होते.
तसेच आभार प्रदर्शन फाउंडेशन चे मार्गदर्शक मा.श्री.राजन बंदपट्टे*यांनी केली.
Comments
Post a Comment