पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष, यांच्या नाभिक जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा!
इंदापूर :प्रतिनिधी.. धनश्री गवळी.
पुणे जिल्हा नाभिक महामंडळाच्या अध्यक्ष श्री रमेश राऊत यांनी दिपावली निमित्त नाभिक जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाश व आनंदाचा दीपावली सण हा नाभिक बांधवांचे आयुष्यात नवी ऊर्जा, उमेद याबरोबर समृद्धी , सलून व्यवसायामध्ये भरभराट येवो, निरोगी आयुष्य लाभो, या शब्दात माननीय रमेश राऊत यांनी पत्राद्वारे, पत्रकारांसमोर शुभेच्छा व्यक्त केल्या.
सद्या कोरोनाचा संसर्ग हा कमी झालेला आहे. तरीही दिवाळी आनंदाने व उत्साही वातावरणात साजरी करताना नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी, समाज बांधवांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे स्वतः कोरोना पासून संरक्षण करा , व आपले कुटुंब सुरक्षित ठेवा,असे आवाहन त्यांनी केले. तसेच दिपावली उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे, अशा प्रकारे जनतेला शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment