इंदापूरात पत्रकारांचा अवमान करणार्‍या नगरपरिषद नगर अभियत्याने मागीतली माफी.

इंदापूर नगरपरिषदेत पत्रकारांच्या ठिय्या आंदोलनाने अधिकार्‍यांना फुटला घाम.
————————————————————————
    इंदापूर नगरपरिषद नगर अभियंता रविराज राऊत यांनी कार्यालयामध्ये पत्रकारास अवमानकारक वागणुक दिल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक  एक नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार सुधाकर बोराटे यांचे नेतृ
त्वाखाली इंदापूर नगरपरिषद कार्यालयामध्ये इंदापूर तालुक्यातील पत्रकारांनी ठीय्या आंदोलन करत नगर अभियंता यांनी जाहिर माफी मागण्याची मागणी मुख्याधीकारी रामराजे कापरे यांचेकडे केली.
  इंदापूर नगरपरिषद कार्यालयामध्ये नगर अभियंता या पदावर सेवेत रूजु असलेले रविराज राऊत यांचेकडे शुक्रवार दिनांक २९ आॅक्टोंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता कार्यालयीन वेळेत नियमानुसार लिखीत अर्ज देवुन इंदापूर शहरातील संत सावतामाळीनगर येथील भैरू शिंदे घर ते जिम ओढा या नविन रस्ता कामाचे प्रशासकीय मंजुरी पत्राची छायांकिंत प्रत मिळणे विषयी विनंती पत्रकार सुधाकर बोराटे.रा.इंदापूर, जि.पूणे यांनी अर्ज केला होता. 

          सदर प्रकरणी नगर अभियंता रविराज राऊत यांनी अर्जदार बोराटे यांना अर्ज आवक जावक विभागात दाखल केल्यानंतर माहिती मिळेल असे उत्तर दीले.त्यावेळी  बोराटे यांनी नियमानुसार अर्ज नगरपरिषद आवक जावक विभागात दाखल करून त्याची पोहच नगरअभियंता यांना दीली व अर्जातील माहिती मागणी केली.परंतु नगरअभियंता यांनी सदरची माहीती देण्यास जाणीवपूर्वक नकार दीला व आवक जावक विभागाकडुन अर्ज प्राप्त झाल्यानंतर माहिती मीळेल अशी उद्दामपणाची भाषा वापरली.

             अर्जदार हे पत्रकार आहेत, त्यांना बातमी लिहण्यासाठी माहीतीची आवश्यकता आसुन ती माहिती आपण लवकर द्यावी अशी विनवणी नगरअभियंता यांना अर्जदार सुधाकर बोराटे यांनी केली. परंतु नगरअभियंता यांनी अर्जदार यांचे काही एक न ऐकता अर्जदार यांचेशी उद्दामपणाचे वर्तन करून हुज्जत घालत अवमानकारक वागणुक दीली असुन सदर घटनेबाबत इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार जाहिर निषेध केला
घडलेल्या प्रकाराबाबत संबधीत अधिकारी नगरअभियंता  रविराज राऊत यांनी जाहिर माफी मागावी यासंदर्भात सोमवार दि.१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सर्व पत्रकार यांनी मिळुन इंदापूर नगरपरिषद कार्यालयामधील मुख्याधीकारी यांचे दालनासमोर ठीय्या आंदोलन सुरू केले. व घडलेल्या घटनेचा निषेध नोदवला.यावेळी नगर अभियंता रविराज राऊत यांनी घडलेली घटना चुकुन अनवधणाने घडली असुन त्याबाबत दिलगीरी व्यक्त करत असल्याचे आंदोलक पत्रकार यांना सांगीतल्याने सदरचे ठिय्या आंदोलन स्थगीत करण्यात आले.
           या आंदोलनामध्ये नगरपरिषद काँग्रेस गटनेता कैलास कदम यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचेशी सविस्तर चर्चा करून महत्वाची भुमीका पार पाडली. यावेळी पत्रकार सुधाकर  बोराटे, रामदास पवार, प्रकाश आरडे, श्रीयश नलवडे,काकासाहेब मांडरे, लक्ष्मण सांगवे, सुरेश मिसाळ, आदम पठाण, योगेश कणसे,दत्तात्रय गवळी (सर) विजय शिंदे, जितेंद्र जाधव, इम्तियाज मुलाणी,सिद्धार्थ मखरे,गणेश कांबळे,नवनाथ कचरे, आशोक घोडके इत्यादी पत्रकारांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog