नगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी केला दीपावलीचा आनंद द्विगुणित
इंदापूर प्रतिनिधी-
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी आज दीपावली निमित्त पाडवा साजरा करताना भाग्यश्री बंगलो याठिकाणी इंदापूर नगरपरिषदेचे सफाई कामगार यांना दीपावलीचा फराळ देत तसेच त्यांना शुभेच्छा देत त्यांनी दीपावलीचा आनंद द्विगुणीत केला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्य सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असते तसेच कोरोना पार्श्वभूमीच्या काळात या सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना धन्यवाद देत त्यांच्याविषयी आपुलकी जपत हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांनी दीपावलीनिमित्त त्यांना शुभेच्छा देत आजचा आनंदाचा क्षण गोड केला आहे.
Comments
Post a Comment