हर्षवर्धन पाटील यांच्या जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा!
इंदापूर :प्रतिनिधी दि.4/11/21 
            भाजप नेते व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिपावली निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाश व आनंदाचा दीपावली सण हा जनतेच्या आयुष्यात नवी ऊर्जा, उमेद याबरोबर समृद्धी व निरोगी आयुष्य देईल, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
           सद्या कोरोनाचा संसर्ग हा कमी झालेला आहे. तरीही दिवाळी आनंदाने व उत्साही वातावरणात साजरी करताना नागरिकांनी  आरोग्याची काळजी घ्यावी त्याचबरोबर प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दिपावली उत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला शुभेच्छा व्यक्त करताना केले आहे.
__________________________

Comments

Popular posts from this blog