" फराळ नको फळे द्या गरजुंना "
प्रतिनिधी वैभव यादव
वर्ष पाचवे  

" फराळ नको फळे द्या गरजुंना " उपक्रमांतर्गत २८७७ गरजुंना केले अन्नदान. 
=====================
रॉबिन हूड आर्मी सोलापूरच्या वतीने सलग पाचव्या वर्षी राबविला उपक्रम. 

सोलापुरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूर च्या वतीने दररोज अन्नदान उपक्रम राबविला जातो आतापर्यंत पाच लाख पेक्षा जास्त गरजूंना अन्नदान करण्यात आले असून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.  दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात मुबलक प्रमाणात फराळ उपलब्ध होत असल्याने गरजुंना रोजच्या जेवणाबरोबर फळे खायला मिळावेत या उद्देशाने रॉबिन हूड आर्मी सोलापूर च्या वतीने सुरु असलेल्या दररोज अन्नदान उपक्रमामध्ये " फराळ नको फळे द्या गरजुंना " उपक्रमांतर्गत २८७७ गरजुंना अन्नदान करण्यात आल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. केळी, चिकू, मोसंबी, डाळिंब, सफरचंद त्याच बरोबर काही प्रमाणात फराळ व फटाके चे ही वाटप करण्यात आले. 

सोलापुरातील कुष्ठरोगी वसाहत, रेणुकादेवी नगर, अशोक चौक परीसर, सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, शनी मंदिर परीसर, रेल्वे स्थानक परीसर, सरस्वती चौक परीसर, वालचंद कॉलेज परिसर, भारत माता नगर, माधव नगर, अक्कलकोट रोड, बाळीवेस, बलिदान चौक, कुंभार वेस, सम्राट चौक, सुनील नगर, विजापूर रोड नंदी वस्ती, धनलक्ष्मी नगर, जुना विडी घरकुल, जोडभावी पेठ, तक्षशिल नगर, विडी घरकुल आदी भागामध्ये दिवाळीच्या कालावधी मध्ये फळे त्याच बरोबर दुग्धजन्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. 

इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर हारमोनी च्या सौ. अर्चना जाजू, हेमा काबरा, तृषा गुप्ता, गीता राजानी, वीणा राठी, अर्पिता लहेजा, महेश बिराजदार, प्रसन्न तंबाके, सचिन निरगिडे, वासंती अय्यर, शन्मुख बलगुंडे, बिपीन आडकी, वैशाली जैन, संदीप जाधव, सुनंदा राजपूत, विवेक दिवाणजी, सुरज रघोजी, अनिल क्षीरसागर, नारायण जोशी, प्रेम भोगडे, सकलेन शेख, सुमित पंडित, रतिकांत राजमाने, स्नेहल चलवादी, बलराज बायस, ज्ञानेश्वर जाधव, शुभांगी भोसले, केतन वोरा, राजू वोरा, मीना वोरा, नारायण जोशी, विपुला घायाळ, संकेत पालकर, सिद्धराम कंकरे, संजय जाधव, मंदार नीळ, शहाजी भोसले, पल्लवी सावस्कर, मोनाली सावस्कर, बलराज बायस, सम्प्रीत कुलकर्णी, शिल्पा सस्ते, अर्चना आघाव, गुरुराज पदमगोंडा, डॉ.न्रिपेंद्र सिंग, साधू वासवानी सेंटर सोलापूर, स्व. कमल राठी, रंगनाथ नाळे, शरणबसवेश्वर वांगी, सुधीर पवार, अजय कृष्णन, डोंगरेश चाबुकस्वार, भास्कर कांबळे, प्रकाशचंद्र मिश्रा, प्रमोद डोके, कपिल मिठ्ठापल्ली, वैष्णवी बाबुळगावकर, सागर पाटील, संदीप पवार, अमृतवेला ट्रस्ट नवजीवन नगर सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, राजगोपाल मिनियार, लक्ष्मी मिनियार, कार्तिक दरगड, स्मिता क्षीरसागर, रोहित पत्तेवार आदींनी आपले योगदान दिले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुराव गोरे, संजीव म्हमाणे, अमोल गुंड, किशोर कलबुर्गी, समर्थ उबाळे, स्वप्नील गुलेद, अरुण कुरहाडकर, रोहित राक्षे, स्वामीराज बाबर, अभिषेक क्षीरसागर, रोहन सावंत, प्रेम कुर्हाडकर, कार्तिक दरगड, सौरभ सिंदगी, संदीप कुलकर्णी, डोंगरेश चाबुकस्वार, सुभाष कुरले, कृष्णा थोरात, अमरदीप सफार, आशिष सुरे, रोहन चव्हाण आदींनी परिश्रम घेतले

Comments

Popular posts from this blog