बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार.....
राहुल मखरे.
इंदापूर प्रतिनिधी.... धनश्री गवळी.
इंदापूर नगरपालिका निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असून आगामी निवडणुकीत पार्टी चे किमान ५ ते ६ नगरसेवक नगरपालिकेत दिसतील असे मत बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय सचिव राहुल मखरे व्यक्त केले. दिनांक ७ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी बोलताना राहुल मखरे म्हणाले की देशात वाढत्या महागाई चा फटका जनतेला बसत आहे.२०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करून चूक झाल्याचे नागरिक भावना व्यक्त करत आहे.त्यामुळे शहरात भारतीय जनता पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची आमची तयारी आहे.
इंदापूर शहर विरोधी पक्षाची जबाबदारी ही बहुजन मुक्ती पार्टी ने पार पडली असून निकृष्ट होणारी रस्त्याची कामे आम्ही व आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवले आहेत. नागरिकांच्या तक्रारी येथील तिथे आम्ही धावून गेलो आहे. त्यामुळे यंदाच्या होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल असे मत यावेळी मखरे यांनी व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबजी नाना भोंग, शहराध्यक्ष संतोष शिरसागर, संजय( डोनाल्ड) शिंदे, राहुल शिंगाडे, सुरज धाईंजे, वसीम शेख, प्रकाश पवार, तौसिफ बागवान, इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment