एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आज इंदापूर येथे बहुजन मुक्ती पार्टी ने केले, रास्ता रोको आंदोलन.....
प्रतिनिधी.... धनश्री गवळी इंदापूर.
आज इंदापूर येथे बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज इंदापूर येथे बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चा , इंदापूर तालुका यांच्या वतीने एसटी स्टँड च्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव एडवोकेट राहुल जी मखरे यांनी केले. दिनांक 28 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या संपास शासनाने अद्याप पर्यंत कसलीही दखल घेतली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून बहुजन मुक्ती पार्टी ने आज रस्ता रोको आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये त्यांनी शासनाला विनंती केली आहे की एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती करावी, तसेच त्यांच्यावर असलेले बँकेचे कर्ज माफ करावे, आतापर्यंत आंदोलन दरम्यान मृत एसटी कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाख रुपये मदत द्यावी व कुटुंबातील एक सदस्य सेवेत घ्यावा, कर्मचाऱ्याना असलेल्या जाचक नियम रद्द करण्यात यावेत, अशाप्रकारे एसटी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या सर्व मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात अन्यथा दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार आहे असे यावेळी सांगितले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय सचिव राहुल जी मखरे, इंदापूर तालुका अध्यक्ष बाबजी भोंग, शहराध्यक्ष संतोष शिरसागर, संजय शिंदे भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष, राहुल शिंगाडे, सुरज धांईंजे,वसीम शेख, प्रकाश पवार, तौसिप बागवान, आकाश जाधव, इम्रान बागवान, बलभीम महाराज राऊत, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment