नीरा भीमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी-कुबेर पूजन उत्साहात
इंदापूर: प्रतिनिधी दि. 4/11/21
शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती दिपावली निमित्ताने लक्ष्मी-कुबेर पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि.4) उत्साहात संपन्न झाले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पूजेचे पौराहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले. सध्या नीरा भीमा कारखान्याचा 21 वा गळीत हंगाम उत्कृष्ठरित्या चालु आहे.
फोटो:- नीरा भीमा कारखान्यावर दीपावली निमित्ताने लक्ष्मी-कुबेर पूजन प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
Comments
Post a Comment