रयत हित फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात..
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असे समजले जाते.शहरातील विविध रुग्णालयात सध्या काही प्रमाणात रक्तपेढीतील साठा कमी पडू लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व वाढावे आणि त्यांना रक्तदाणासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने 'रयत हित फाउंडेशन'आणि स्व.अविनाश धोत्रे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी चिंचोली काटी येथे करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन बापु भोसले आणि प्रहारचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात रयत हित फाउंडेशनचे संस्थापक शिवाजी सावंत यांनी रक्तदानाचे महत्व गावातील तरुणाईला समजावून सांगितले.वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यूच्या घटना आपल्या कानावर येतात.त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले.सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गावचे माजी सरपंच रमेश पवार,महेंद्र वाघमारे,आझम शेख, दादासाहेब नागणे,बाबा धोत्रे,अनिल भोसले, रामलिंग धोत्रे,दीपक वाघमारे, सचिन अलदर,महेश भोसले तसेच गावातील अनेक युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment