एसटी कर्मचारी इंदापूर यांना दिला मदतीचा हात.....
प्रतिनिधी इंदापूर... धनश्री गवळी
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी . मोर्चा इंदापूर तालुका अध्यक्ष पांडूरंग तात्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली S T . कामगारांना मदतीचा हाथ. काल इंदापूर आगार येथेआंदोलन स्थळी मा पांडूरंग ( तात्या ) शिंदे . हे कामगारांना भेटण्यास विचारपूस करण्यात गेले होते त्या ठिकाणी कामगारांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या .. काही कामगाराने सांगितले की आम्ही आज फक्त थोडेफार पोहे खाल्ले आहे त्यानंतर आम्ही सर्व कामगार उपाशी आहोत आमच्या कडे जेवणाकरीता काहीच सामान शिल्लक नाही … आम्ही कामगारांकडून पैसे गोळा करून जेवण खर्च करतोय .. आम्हाला कुठल्याच नेत्यांना मदत केली नाही हे ऐकुण तात्यांना काही राहावासे वाटले नाही ,तात्या काही क्षणापूर्ते भावनिक झाले .. त्यांनी त्या कामगारांना सांगितले तुम्ही काही काळजी करु नका मी तुमच्या पाठिशी आहे कुठली ही अडचण असो आम्ही तुम्हाला मदत करू .. मी तुमची जेवणाची सोय करतो शब्द दिला आणि त्याने तो पाळला त्यानी व त्याच्या कार्यकर्त्यांनी जेवणाचे सामान पोहच केले.
तात्या म्हणाले B J P पक्ष तुमच्या पाठीशी आहे तुम्ही घाबरू नका मा . हर्षवर्धनजी पाटील साहेब ही तुमच्या सोबत आहेत त्यांची चर्चा ही वरिष्ट पातळीवर चालू आहे त्यांचे ही म्हणणे आहे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे . विलिनीकरण झाले पाहिजे ..
तात्यांनी त्यांना ही मदत करून त्या कामगारांना बळ ताकद मिळाली .. पुढील आंदोलन चालवण्यासाठी ताकद आत्मविश्वास वाढला . यावेळी
विशाल फोंडे , तेजस शिंदे,
संतोष राऊत , उमेश साळुंखे, रोहीत शिंदे,
बाबजी वाघमोडे , अंबादास ढावरे ,
ओंकार हिंगमिरे, व इतर कार्यकर्तेे उपस्थित होते..
Comments
Post a Comment