इंदापुरमध्ये योगभवन उभारले जाणार - हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी-
  पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समिती, 
संजीवन योग सेवा संस्था इंदापूर, शहा ब्रदर्स अँन्ड कंपनी इंदापूर यांच्या वतीने इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनमध्ये सुरू असलेल्या अखंड निःशुल्क योग प्राणायाम
स्थाई केंद्राचा१७ वा वर्धापन दिन सोमवार दि.०६ डिसेंबर रोजी पहाटे योग साधना द्वारा साजरा करण्यात आला यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरमध्ये योग साधनेसाठी भव्य असे योगभवन उभारले जाणार असल्याची माहिती दिली.
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' पतंजली योग समितीचे मार्गदर्शक आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून इंदापूर येथे अनेक वर्षापासून योग साधना द्वारे लोकांच्या निरोगी जीवनासाठी प्रयत्न केला जात असून योगाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण अशाप्रकारचे महत्त्व आहे. अलीकडील वाढता ताणतणाव तसेच कोरोना पार्श्वभूमीवर योगास असणारे महत्त्व लक्षात घेऊन इंदापूरमध्ये भव्य असे योगभवनाची उभारणी केली जाणार आहे.'
    दत्तात्रेय अनपट आणि पतंजली योग समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog